मंगळवेढा येथे आ.समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी संपन्न

मंगळवेढा येथे आ.समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी संपन्न

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा शहरातील सुतार गल्ली येथे रमजान महिन्या निमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांनी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

रमजान या पवित्र महिन्यात रोजा ग्रहण असणाऱ्या मुस्लिम बांधवांसोबत इफ्तार केला जातो.अशा सर्व बांधवांच्यावतीने तसेच मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून आमदार समाधान आवताडे यांचा आदरपूर्वक सत्कार करुन स्वागत करण्यात आले.आ.आवताडे यांनीही सन्मान स्वीकारून रमजानच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या इफ्तार पार्टीसाठी माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय सरचिटणीस लतीफ तांबोळी,माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, नगरपरिषद माजी पक्षनेते अजित जगताप, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे,माजी नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी-कोळी, उद्योजक सरोज काझी, प्रवीण खवतोडे,बबलू सुतार, नजीर इनामदार आदी तसेच समाजबांधवांसह इतर नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top