पंढरपूर अंधशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23/05/2024- लायन्स क्लब पंढरपूर यांची अंध विकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर येथे सन २०२४- २०२५ या नवीन शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्रातील अंध विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इयत्ता पहिली ते आठवीच्या अंध विद्यार्थ्यांना मोफत निवासी प्रवेश देण्यात येत आहे.
तरी वय वर्षे चार ते पंधरा वयोगटातील अंध विद्यार्थी विद्यार्थिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेचे संस्थापक अध्यक्ष मुन्नागीर गोसावी यांनी कळविले आहे.
सदर प्रवेश ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही प्रकारे करता येईल. अधिक माहितीसाठी- बाराहाते सर 9822938586 , म्हेत्रे सर 9423335903 यांच्याशी संपर्क साधावा.