सोलापूर:- सोलापूर गांधी नाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान सोलापूर व सर्वोदय विकास प्रभावना ट्रस्ट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी श्री वीतराग विज्ञान बाल-युवा संस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा सानंद संपन्न झाला. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडित प्रशांतजी मोहरे यांनी केले. मंगलाचरण .दीपा शहा व महिला मंडळ यांनी केले. हर्षवर्धन शहा वाडीकर व परिवार यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. संतोष जोशी, डॉ. अरिंजय दोशी, विजयकुमार शहा व चैतन्य गांधी यांच्या शुभहस्ते क्रमशः जिन संस्कार पाठमाला,बालबोध पाठमाला अभ्यासिका भाग एक-दोन – तीन या ग्रंथाचे शास्त्र विमोचन करण्यात आले. णमोकार स्वाध्याय मंडळचे सुकुमार चंकेश्वरा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
श्री. अमेय दोशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. धार्मिक अध्ययन करण्यासाठी आलेले पंडित जितेंद्रजी राठी यांनी विद्यार्थ्यांना शिबिराचे महत्त्व पटवून देऊन मार्गदर्शन केले. सर्वच पण्डित विद्वानांचे स्वागत करण्यात आले. प्रस्तुत कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वपरिचय करून दिला व उद्घाटनकर्ता .हर्षवर्धन शहा यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. .निशा गांधी यांनी उपस्थित सर्वच मान्यवरांचे आभार मानले. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित रवींद्र काळे यांनी केले.

