जेजुरी मंदीरात ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला


jejuri 600
महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. भाविकांसाठी आजपासून ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्ट कडून घेण्यात आला आहे. या साठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या पुढे मंदिरात दर्शनासाठी पाश्चात्य कपड्यांवर बंदी घालण्यात आली असून मंदिरात येण्यासाठी भारतीय कपडे परिधान करणे आवश्यक आहे. 

ALSO READ: तुम्ही कधीही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही…फडणवीसांवर उद्धव ठाकरेंची टीका
भारतीय वेशभूषा परिधान करणाऱ्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश करता येणार आहे. कमी कपड्यांमध्ये असणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. फाटक्या जीन्स, बर्मुडा, शॉर्ट, स्कर्ट असे कपडे घालून भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम लागू आहे. 

ALSO READ: महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत मंत्री शंभूराज देसाईंनी दिले अपडेट
जेजुरी मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय मार्तंड देव संस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे. 

आता या पुढे पाश्चात्य कपडे परिधान करणाऱ्यांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही. हा नियम केवळ जेजुरीतील खंडोबा देवस्थानासाठी लागू करण्यात आला आहे. 

Edited By – Priya Dixit  

ALSO READ: औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान समोर आले

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top