खोटा आणि भूलथापा देणारा अर्थसंकल्प सादर :- चेतन नरोटे
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०३/२०२५- आज महायुती सरकारने अर्थसंकल्प सादर केला.निवडणुकी वेळी अनेक आश्वासने दिली होती ते सर्व भूलथापा होते हे आता सिद्ध झाले आहे कारण शेतकऱ्यांची कर्ज माफी नाही,युवकांच्या रोजगार वाढीसाठी काही नाही, महागाई कमी करण्यासाठी कुठलीही तरतूद नाही,लाडक्या बहिणींना २१०० न देता फसविले,कित्येक वर्षे झाली राज्यातील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक यांना करता येईना आणि आग्र्यातले स्मारकाची घोषणा केली यांच्यावर काय भरवसा ठेवायचा ?
सोलापूरसाठी या अर्थसंकल्पात एक रुपयाचा उल्लेख नाही. बोरामणी विमान तळासाठी निधी देतील असे वाटले होते तेही नाही.काढा कर्ज,करा खर्च,भरा व्याज हे असेच चालू आहे.महाराष्ट्राला केवळ कर्जात लोटण्याचे काम सुरू आहे.राज्य दिवाळखोरी च्या उंबऱ्यावर असताना कितीही मोठ्या घोषणा केल्या तरी त्या वास्तवात कशा येतील ? असा प्रश्न कॉंग्रेसचे सोलापूर शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केला आहे.