पंढरपूर येथे होमिओपॅथिक डॉक्टरांची सीएमई संपन्न
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज-दि. ०६/०३/२०२५ रोजी एसबीएल प्रायव्हेट लिमिटेड व पार्थ होमिओ फार्मसी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सीएमई चे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख अतिथी डॉ आकाराम साळुंखे,डॉ ज्ञानेश्वर पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संजय देशमुख यांनी केले.सूत्रसंचालन डॉ रणजित ढोले यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ सौ संगीता पाटील यांनी करून दिला.

शहर व ग्रामीण भागातील डॉक्टरांना अद्ययावत माहिती मिळावी या उद्देशाने या सीएमई चे आयोजन करण्यात आले होते. या सीएमई साठी होमिओपॅथिक संघटनेचे पदाधिकारी, सभासद बंधू भगिनी उपस्थित होते.डॉ संजय देशमुख,डॉ सौ अंजली देशमुख यांनी एसबीएल तर्फे नियोजन केले होते.
सांगोला,मंगळवेढा,बार्शी,अकलूज,सोलापूर ,मोहोळ या ठिकाणाहून डॉक्टरांनी सीएमई साठी उपस्थिती दर्शवली. पंढरपूर तालुकाए होमिपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्यावतीने गेल्या वर्षभरात घेण्यात आलेल्या उपक्रमांची तसेच पुढील काळात करण्यात येणारे विविध आरोग्य विषयक उपक्रम,योजनांची माहिती संघटनेच्या अध्यक्षा डॉ सौ जयश्री सुधीर शिनगारे यांनी दिली.आभार प्रदर्शन डॉ पार्थं देशमुख यांनी केले.
