उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांच्या सूचनांवर पुणे विद्यापीठाकडून तत्काळ कार्यवाही
वसतिगृहातील उंदीरांचा उच्छाद टळणार
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ मार्च २०२५ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये वाढता उंदीरांचा सुळसुळाट आणि अस्वच्छता याबाबत विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत पुणे विद्यापीठाने त्वरित उपयोजना केल्या आहेत.याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित ही गंभीर समस्या लक्षात घेता उपाययोजना केल्या आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वसतिगृहात गेल्या काही महिन्यांपासून अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता. वसतिगृहा तील एका विद्यार्थ्याला उंदराने चावा घेतल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते.वसतिगृह परिसरात उंदरांची वाढलेली संख्या व अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते.
विद्यापीठ परिसरामध्ये मुलांचे वसतिगृह क्र. G-6 व G-8 च्या मागच्या बाजूला झाडी असल्यामुळे तेथे उंदीर व सापांची संख्या आढळून येते.विद्यार्थी खोल्यांमध्ये खाद्य पदार्थ उघडे ठेवतात.त्यामुळे उंदीर खाद्य पदार्थाच्या वासामुळे खोलीमध्ये प्रवेश करतात असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत दिलेल्या सूचनांची त्वरित दखल घेतल्याने विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी यांनी पुणे विद्यापीठ कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी, प्रा.प्रकलुगुरू पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.ज्योती भाकरे व समस्त टीमचे आभार व्यक्त केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वसतिगृहात तोडगा काढण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात आल्या आहेत-खाद्यपदार्थ उघडे ठेवू नये अशा विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत,खोलीची खिडकी (तळमजल्यावरील खोल्या) शक्यतो बंद ठेवण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत,वसतिगृह परिसराची स्वच्छता स्वच्छकांकडून नियमितपणे केली जावी,वसतिगृह परिसरातील गवत नियमितपणे कापले जाते,नियमितपणे वसतिगृह परिसरामध्ये व खोल्यामध्ये औषध फवारणी केली जाते,पुणे महानगरपालिके द्वारे वसतिगृह परिसरामध्ये उंदीरनाशक औषधे टाकलेली आहेत,वसतिगृहाची डागडूजी नियमितपणे केली जाईल.
मुलांचे वसतिगृह क्र. G-6 च्या छतांच्या पत्र्यांची डागडूजी केलेली आहे तसेच जुने पत्रे बदलण्याबाबत स्थावर विभागाला सूचना दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या समस्या त्वरित वसतिगृह कार्यालयाला कळविणे आवश्यक आहे, त्यासाठी पुरेसे शिक्षक वसतिगृह प्रमुख व पुरेसे वसतिगृह सहायक नियुक्त करण्या बाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
विद्यापीठ परिसरात आरोग्यकेंद्राची सुविधा असून त्यातील डॉक्टर व स्टाफकडून आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत.