दहावीच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्या – प्रांताधिकारी सचिन इथापे

दहावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी – प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या सूचना

दहावीच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्या

पंढरपूर ,दि.04 :- इयत्ता दहावीच्या उर्वरित पेपरसाठीची परिक्षा अत्यंक कडक आणि शिस्तबध्द घेण्यात याव्यात. तालुक्यात बोर्डाच्या परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रावर गैरप्रकार होणार नाही दक्षता घेवून दहावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी तसेच परिक्षेसाठी कॉपी करणारा आणि कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.

तालुक्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी शेतकी भवन पंचायत समिती पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे,नायब तहसिलदार वैभव बुचके यांच्यासह परिक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे म्हणाले, सध्या दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा सुरू आहे. उर्वरित पेपरसाठी कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात. कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर कडक व वेळप्रसंगी फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.परिक्षा या कॉपीमुक्त होण्यासाठी भरारी पथक कार्यरत असून त्याव्दारे परिक्षा केंद्रावर निगराणी करण्यात येत आहे.प्रशासनाच्या कॉपीमुक्त अभियानात विद्यार्थी,पालक,शिक्षकांनी सहभागी होवून हे अभियान यशस्वी करण्यास सहकार्य करण्याचे आवाहनही प्रांताधिकारी श्री.इथापे यांनी केले आहे.

परीक्षेदरम्यान गोंधळ होऊ नये तसेच परिक्षा केंद्रावर सुरक्षा व्यवस्था चोख राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले यांनी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top