अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई -तहसिलदार सचिन लंगुटे
सहा लाकडी होड्या केल्या नष्ट
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.05:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने चंद्रभागा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सहा लाकडी होड्या जेसीबी साह्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे.दि.०४ मार्च २०२५ रोजी पंढरपूर शहरा नजीकच्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सहा लाकडी होड्या जेसीबी च्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत.

या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंढरपूर विजय शिवशरण, ग्राममहसूल अधिकारी अमर पाटील ,प्रमोद खंडागळे ,संजय खंडागळे,महेश सावंत,गणेश पिसे,सचिन चराटे, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री नागणे सहभागी होते.