आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- विधानसभा निवडणूक प्रचार संपण्यास थोडाच कालावधी राहिला आहे.सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुती चे अधिकृत उमेदवार कॅप्टन तमीळ सेल्वन यांच्या प्रचार रॅलीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित राहिले.आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महायुती चे उमेदवार कॅप्टन तमिळ सेल्वन यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन ना. रामदास आठवले यांनी सायन कोळीवाडा येथील जनतेला केले.

तर मुलुंड विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे उपस्थित राहिले.यावेळी ना.रामदास आठवले यांनी मिहीर कोटेचा यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

