कार्तिकी वारीत स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा पोलीस मित्र या उपक्रमात सहभाग
प्रशासनासोबत विद्यार्थ्यांनी केली वारकऱ्यांना मदत
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- वारीच्या निमित्ताने विविध संतांच्या मानाच्या पालख्या पंढरीत येत असतात त्यामुळे पंढरीत लाखो वारकरी जमा होतात. वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन, नगरपालिका व सुरक्षा बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासन यांचा मोठा ताफा असतो. वारकऱ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्वेरीकडून प्रशासनास सहकार्य केले जाते.यावर्षीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस), पंढरपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्तिकी वारीत पोलीस मित्र या उपक्रमात सहभाग घेण्यात आला.

यंदाच्या कार्तिकी वारीमध्ये दि.१० नोव्हेंबर पासून ते १२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत तीन दिवस गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील राष्ट्रीय सेवा योजनेतील तब्बल २०० विद्यार्थी व ३० प्राध्यापकांनी पंढरपूर पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने पोलीस मित्र बनून वारकऱ्यांची सेवा केली.पंढरपूर शहरात वारकऱ्यांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंढरपूर पोलीस प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, वीर सावरकर चौक, अंबाबाई पटांगण आणि पुंडलीक मंदिर या चार ठिकाणी पोलीस मदत केंद्र स्थापित करण्यात आले होते. या पोलीस केंद्राच्या माध्यमातून स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांची सेवा केली. यामध्ये, वारकऱ्यांना दवाखाने, मठ, मंदीरे, मदत केंद्र, महत्वाचे रस्ते याबाबत स्वेरीचे विद्यार्थी माहिती देत होते तसेच स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने उदघोषणेद्वारे नातेवाईकां पासून चुकलेल्या वारकऱ्यांना मदत करत होते व सल्ले देत होते.
पोलीस मित्र या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पंढरपूर विभागाचे डीवायएसपी डॉ अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मोनिका खडके पाटील,महिला पोलीस कॉन्स्टेबल निर्मला वाघमारे,पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी बिरा आवटे, पोलीस नाईक सागर सावंत, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग टिंगरे यांनी कार्यभार हाताळला.
संस्थेचे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या माध्यमातून व उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार यांच्या प्रोत्साहनाने विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस. मठपती,रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.डी. एस.चौधरी,डॉ.एम.एम. आवताडे,प्रा.एस. डी.इंदलकर, प्रा.एम.ए.सोनटक्के,प्रा.के.पी. पुकाळे,प्रा.एस.डी.माळी, प्रा.जी.जी.फलमारी,प्रा.ए.व्हीभानवसे यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी यांच्या सहकार्याने तीन दिवस स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी पोलीस मित्र बनून सेवेचे व्रत पूर्ण केले.
