मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पंढरपूर येथे गणेश जाधव महाराज यांचे आजपासून आमरण उपोषण

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पंढरपूर येथे गणेश जाधव महाराज यांनी आजपासून आमरण उपोषण

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०९/२०२४- मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे सहाव्यांदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांचा उपोषणाचा ९ दिवस आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर तहसील कचेरी येथे गणेश जाधव महाराज यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

अखंड भारताचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन उपोषणाला सुरुवात केली या निर्बुद्ध सरकारला चांगली बुद्धी देऊन तात्काळ आरक्षण देण्याची साकडे श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी घातले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top