मंदिर समितीच्या लेखा अधिकारीपदी मुकेश अनेचा यांची नियुक्ती

मंदिर समितीच्या लेखा अधिकारीपदी मुकेश अनेचा यांची नियुक्ती

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या लेखा अधिकारी पदी शासनाने प्रतिनियुक्तीवर मुकेश अनेचा यांची नियुक्ती केली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

दि.23 सप्टेंबर रोजी लेखा अधिकारी पदाचा पदभार श्री अनेचा यांनी स्विकारला आहे. यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्री.अनेचा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, विनोद पाटील, ज्ञानेश्वर कुलकर्णी, पांडुरंग बुरांडे, राजेंद्र सुभेदार, अतुल बक्षी, दादा नलवडे व इतर कर्मचारी उपस्थित होते. अनेचा हे यापूर्वी जलजीवन मिशन गोंदिया येथे कार्यरत होते.

मंदिर समितीच्या आस्थापनेवर उपजिल्हाधिकारी संवर्गातून कार्यकारी अधिकारी, नायब तहसिलदार संवर्गातून व्यवस्थापक तसेच वित्त व लेखा सेवा मार्फत लेखा अधिकारी ही शासन प्रतिनियुक्तीवरील पदे आहेत. शासनाने सन 2015 मध्ये मंदिर समितीच्या आस्थापनेवर लेखा अधिकारी या पदाची निर्मिती केली असून ,आतापर्यंत रविंद्र वाळुजकर, सुरेश कदम, अनिल पाटील यांनी काम पाहिले आहे. मंदिर समितीतील लेखा अधिकारी पद मागील एक वर्षापासून रिक्त होते. सदरचे पद तातडीने भरणेबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. लेखा अधिकारी पद उपलब्ध झाल्याने ई निविदा पध्दती, दैनंदिन जमा खर्च व इतर अनुषंगीक कामांमध्ये सुसुत्रता आलेली आहे. सदर पद मंदिर समिती व्यवस्थापनाच्या दृष्टीने फायदेशिर सिध्द झाल्याचे दिसून येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी सांगीतले.

सदरचे पद भरणेकामी मंत्रालयस्तरावर मंदिर समितीचे सदस्य आ.रामचंद्र कदम,शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम,भास्करगिरी बाबा,संभाजी शिंदे,ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर,ॲड. माधवी निगडे,ह.भ.प.प्रकाश जवंजाळ,अतुलशास्त्री भगरे गुरूजी,ह.भ.प.शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,व्यवस्थापक मनोज श्रोत्री व आस्थापना विभाग प्रमुख विनोद पाटील यांनी पाठपुरावा केला होता. 

मंदिर समितीच्या आस्थापनेवर कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक व लेखा अधिकारी अशा तिन्ही पदांवर पूर्णवेळ शासनाने अधिकारी नियुक्त केल्याने कामकाज गतीमान होऊन, येणा-या वारकरी भाविकांना जलद गतीने पुरेसा सोई सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. सदरचे पद भरणेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वेळोवेळी समक्ष भेटून पाठपुरावा केला होता. शासनाचे शतश: आभार….सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top