नंबर प्लेटच्या तक्रारीची गाडी सि.ओ.मॅडमने वापरण्याचे थांबवून लपवून ठेवली? त्यामुळे आरटीओ चे पथक “ती” गाडी शोधण्यास हतबल….!

नांदेड -(विशेष प्रतिनिधी) जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतःला वापरण्यास एम.एच. २६ सी एच ७२०९ ही आलिशान गाडी २२८० रुपये रोजाने भाडेतत्त्वावर घेतली .पण त्या गाडीवर नियमाप्रमाणे पिवळे रंगाची नंबर प्लेट न लावता पांढरी नंबर प्लेट लावली.या नियमबाह्य कारभारा विरुद्ध जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी तक्रार केल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाचे वायुवेग पथक कार्यवाही करण्यास गाडी शोधण्यास कामाला लागले.पण त्यांना ती गाडी कुठेच सापडत नाही असा बहाणा लावला. तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरटीओच्या कारवाईच्या भीतीने ही गाडी लपवून ठेवली का? हा प्रश्न समोर येतो.
जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासनाने गाडी दिलेली असते. पण तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी आपल्या पदाचा वापर करून नवीन आलिशान इनोव्हा गाडी २२८० रुपये रोज दराने भाडेतत्त्वावर घेतली. व विद्यमान सि.ओ. मेघना कावली हया पण आता हीच गाडी वापरतात .या गाडीचा नंबर एम एच २६ सी एच ७२०९ असून ही गाडी परिवहन संवर्गातील म्हणजे परमिटची असल्यामुळे या वाहनाची नंबर प्लेट पिवळ्या रंगाची असावी लागते.तसेच ही गाडी २०२३ ला खरेदी केलेली असल्यामुळे या गाडीला उच्च सुरक्षा नोंदणी नुसार पिवळ्या रंगाची पाटी दिली असावी .पण या नंबर प्लेट पाटीची छेडछाड व खाडाखोड करून ही पाटी पांढऱ्या रंगाची लावली. हा गंभीर गुन्हा असून एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडून होत आहे .म्हणून जागृत नागरिक, व जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी ही नंबर प्लेट चुकीची असल्यामुळे योग्य कारवाई करण्याची तक्रार प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांना दि.१०-२-२०२५ ला केली होती. व त्या तक्रारीवरून केलेल्या कारवाईचा पाठपुरावा केला. शेवटी माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत केलेल्या कारवाई चा अहवाल दि. १६-४-२०२५ ला आर.टी.ओ.कडे मागितला. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वायू वेग पथकाचे निरीक्षक किशोर भोसले यांनी माहिती दिली की आम्ही बरेचदा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शासकीय बंगल्यावर गेलोत, जिल्हा परिषद कार्यालयात गेलो होतोत व रस्त्यावरही गाडी शोधली पण हे सदरील वाहन आम्हाला सापडलेच नाही. वास्तविक मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयात जातात, मंत्र्याच्या कॅनव्हा मध्ये असतात, आर. टी.ओ. यांनी घेतलेल्याला कार्यक्रमात याच गाडीने जातात. तरी आर.टी.ओ.च्या वायूवेग पथकाला ही गाडी दिसत नाही. त्यामुळे या अहवालावरून हे दिसून येते की प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या गाडीवर कारवाई करण्यास भीती वाटते कींवा हिंमतच होत नसेल.किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आपल्या गाडीवरील होणाऱ्या कारवाईला भील्या व त्यांनी सदरील गाडी काही दिवस वापरलीच नाही की गुपित ठिकाणी लपवून ठेवली. कारण पथकाला गाडी कुठेच दिसत नव्हती. असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहिती नुसार समजते. आता ती गाडी आरटीओ अधिकार्‍यांना सापडते की मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीवर कारवाई होण्याच्या अगोदर नंबर प्लेट बदलतील याकडे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top