विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्हे या मोरगावच्या श्री मयुरेश्वराच्या दर्शनास
अष्टविनायकांची पहाणी करून प्रलंबित प्रश्नांची पाठपुरावा करण्याचा केला संकल्प
मोरगाव पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३: अष्टविनायकांपैकी श्री मयुरेश्वर मोरगाव,जि.पुणें यांचे दर्शन विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेता डॅा.निलम गोर्हे यांनी घेतले. यावेळी अथर्वशीर्ष व गणपतींची आरती म्हणुन संकल्पसिद्धी साठी श्रीफलांचे तोरण अर्पण करण्यात आले. तसेच देवस्थानास २१००० रुपयांचा चेक सुपुर्द करण्यात आला. यावेळी संस्थांच्या वतीने महावस्त्र व मयुरेश्वर यांची प्रतिमा देऊन डॉ.निलमताई गोर्हे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ना.नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाले व एनडीएचे सरकार निवडुन आले त्याबद्दल आभार मानले. यावेळी अष्टविनायकाच्या प्रत्येक देवस्थानांच्या विकासाच्या प्रलंबित प्रश्नांवर राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ नीलमताईंची बहिण जेहलम जोशी व उपसभापती कार्यालयाचे अधिकारी अरविंद माळी, योगेश जाधव, प्रतिभा राऊत, सामाजिक कार्यकर्ते युवराज सुर्यवंशी, शिवसेना पुणें पदाधिकारी युवराज शिंगाडे , राजु तम्मा विटकर आदी उपस्थित होते .