आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा रिपब्लिकन पक्षाने केला तीव्र निषेध
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दिनांक 13 – दलित आदिवासी मागासवर्गीयांचे आरक्षण संपविण्याचा निर्णय काँग्रेस भविष्यात घेईल असे आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईत आझाद मैदान येथे तीव्र निषेध करण्यात आला.
रिपब्लिकन पक्षाने मुंबईत आझाद मैदान आणि राज्यभर अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पलने मारून तीव्र निषेध आंदोलन केले.

मुंबईत आझाद मैदानात झालेल्या निषेध आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री अविनाश महातेकर ,राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे आणि रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी केले.यावेळी विवेक पवार,संजय डोळसे,रमेश गायकवाड, सचीन मोहिते, मुंबई उपाध्यक्ष सोहेल शेख,उषाताई रामलू, दयाळ बहादुरे, जिल्हाध्यक्ष संजय पवार,प्रकाश जाधव,अजित रणदिवे,सोना कांबळे,शिरीष चीखळकर,सुभाष साळवे,रतन आस्वारे , किसन रोकडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
भविष्यात सामाजिकदृष्ट्या भारत सक्षम झाल्यानंतर दलित आदिवासी मागासवर्गीयांचे आरक्षण समाप्त करू असे आरक्षणविरोधी वक्तव्य अमेरिकेत जाऊन करणारे राहुल गांधी हे मुर्खांच्या नंदनवनात वावरणारे राजकुमार आहेत.अशा मुर्खांना जोड्याने मारले पाहिजे म्हणून त्यांच्या फोटो ला जोडे मारून निषेध आंदोलन आम्ही करीत आहोत असे रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.