गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पंढरपूर येथील अन्नदानेश्वर अन्नक्षेत्रास भेट
पंढरपूर, ज्ञानप्रवाह न्यूज,ता.22 गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल दर्शनाला आले असताना,भाविकांसाठी मोफत अन्नक्षेत्र सुरू करण्यात आलेल्या श्री अन्नदानेश्वर अन्नक्षेत्रास आवर्जून भेट दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष वामन यलमार सचिव संतोष करचे उपस्थित होते.
पंढरपूर येथील पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करणारे वामन यलमार तसेच त्यांचे मित्र संतोष करचे हे दोघे मागील चार वर्षापासून पंढरपूर येथे वारीनिमित्त येणाऱ्या पोलीस बांधवांना मोफत भोजनाची व्यवस्था करीत होते.यातूनच त्यांना अन्नक्षेत्र उभारण्याची प्रेरणा मिळाली आणि वामन येलमार आणि संतोष करचे यांनी बिर्ला धर्मशाळा येथे रेल्वे स्टेशन समोर मोफत अन्नक्षेत्र सुरू करण्याचे ठरवले.
त्याप्रमाणे त्यांनी या आषाढी वारीमध्ये श्री अन्नदानेश्वर महाराज अन्नक्षेत्र या नावाने मोफत अन्नदानाचे शिबिर सुरू केले आणि बिर्ला धर्मशाळा येथे असणारे संकुल भक्त संकुल म्हणून मोफत चालू केले.शहर पोलीस स्टेशन येथे मोफत पोलीस कर्मचाऱ्यांना भोजनाची व्यवस्था आणि 65 एकर येथे देखील मोफत अन्नदानाची सोय करण्यात आली.
या आषाढी वारीमध्ये किमान साडेतीन लाख वारकऱ्यांनी अन्नदानाचा लाभ घेतला असल्याची माहिती वामन यलमार व संतोष करचे यांनी दिली.आपण पंढरपूर पुण्यनगरी मध्ये पोलीस विभागात असून समाजसेवेचे व्रत घेतले आहे.आपल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमास गोवा सरकारच्या वतीने सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले असल्याचे सांगितले.
या उपक्रमामध्ये स्वेरी कॉलेजचे शंभर विद्यार्थी पंधरा दिवस अहोरात्र प्रयत्न करत होते.या उपक्रमास स्वेरी कॉलेजचे प्राचार्य बी.पी.रोंगे सर,भारतीय शेअर्स मार्केटचे पुणे येथील रवींद्र भारती,शुभांगी भारती, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी, शिवसेना नेते संजय माशीलकर,जिल्हा शिवसेना प्रमुख चरणराज चौरे,विठ्ठल कटकमवार,प्रशांत उत्तरराव, आर.के.चव्हाण, उद्योगपती प्रेम केलानी,संभाजीनगर येथील गोविंद ताठे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या अन्नक्षेत्रास भेट दिली. यावेळी सूत्रसंचालन निवेदिका रेखा चंद्रराव यांनी केले.