सोलापूर – श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव माने यांनी उत्तर सोलापूर तालुक्यास विकासाच्या शिखरावर नेले. बळीराजाच्या न्यायासाठी ते सदैव पुढे असतात.त्यांचा वाढदिवस हा विधायक उपक्रमातून साजरा केला जात असून, एकरुख येथील कार्यकर्त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून वाढदिवस उपक्रमाचा श्रीगणेशा केल्याचे माजी उपसभापती संभाजी भडकुंबे यांनी सांगितले.
एकरुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना लहू भोरे,अभिजीत भोरे, नवनाथ चव्हाण व मित्र मंडळाचे वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मार्डी बृहत् वि.का.सेवा सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील होते.यावेळी राळेरास सरपंच नागनाथ माने,चेअरमन नेताजी डांगे उपस्थित होते.

माने परिवाराचे उत्तर सोलापूर तालुक्यावर अनंत उपकार आहेत. स्व.दादा नंतर दिलीपराव माने व आता पृथ्वीराज माने हे तालुक्यात कुटुंब समजून काम करीत आहेत.पाणीटंचाई, अतिवृष्टी,वीज,रस्ते किंवा काहीही असो फक्त फोनवर सांगितले तरी ते काम होतेच.बाजार समितीमध्ये सभापती झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाचे राज्यात कौतुक होत आहे. तालुक्यातील कार्यकर्त्याचे बैठकीत ठरले प्रमाणे वाढदिवस विधायक उपक्रमाने संपन्न होत असून एकरुख येथील कार्यकर्त्यांनी पहिला उपक्रम राबवला असल्याचे भडकुंबे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्याम पाटील यांनी केले.