तुमसर–(सखाराम कुलकर्णी)-नागपंचमीचे औचित्य साधून मानव अधिकार फेडरेशन तुमसर व बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण झुला, व महिलांसाठी विविध स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी सौ विनया सेन मॅडम, सौ मालती शेडे , सौ. सुनीता पांडे अध्यक्ष मानव अधिकार फेडरेशन तुमसर, आंचल मेश्राम, सेक्रेटरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. या मध्ये श्रावण झुला व विधानसभा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये प्रयास बचत गट, अभिनव बचत गट, शिवाय बचत गट भजन मंडळातील सर्व सदस्य, तसेच मानव अधिकार चे सर्व सदस्यांची उपस्थिती होती.
