सोलापूर:- एन एम वाडिया चॅरिटेबल ट्रस्टच्या नूतनीकरण केलेल्या अनेक विभागांचे आज मान्यवरांतर्फे उद्घाटन झाले.प्रथम डॉक्टर वैशंपायन यांच्या पुतळ्याला त्यांचे डॉक्टर नातू राजीव वैशंपायन आणि कुटुंबीयांतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बालाजी अमाईन्स सीईओ श्री प्रताप रेड्डी यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या ओपीडी विभागाचे उद्घाटन झाले. डॉक्टर उमा वळसंगकर, उद्योजक श्री रंगनाथजी बंग, सीए राजेश पटवर्धन, वाडिया हॉस्पिटलचे भूतपूर्व कर्मचारी यांच्या हस्ते विविध विभागांचे उद्घाटन करण्यात आले.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूरचे भूतपूर्व जिल्हाधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्यासह श्री प्रताप रेड्डी डॉक्टर उमा वळसंगकर डॉक्टर राजीव वैशंपायन श्री राजेश पटवर्धन जिल्हा सरकारी वकील श्री प्रदीप सिंह रजपूत, शिरीष गोडबोले हे होते.
वाडिया हॉस्पिटलमध्ये पूर्वी ज्यांनी सेवा दिली होती अशा अनेक ज्येष्ठ डॉक्टरांना डॉक्टर सुनील मेहता डॉक्टर राजेंद्र घुली, डॉक्टर विजय सावसकर, एडवोकेट नितीन हबीब, सीए राजन रिसबूड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष प्रवीण सिंह परदेशी यांनी त्यांच्या कार्यकाळात वाडिया हॉस्पिटल जेव्हा कार्यरत होते तेव्हाची आठवण सांगितली. त्यांच्या आजीच्या निधन समयी प्रख्यात अभिनेते रमेश देव यांना हृदयविकाराचा झटका आला त्या वेळेला वाडिया हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांनी जी सेवा दिली त्यानंतर नव्वदी पर्यंत त्यांना आयुष्य लाभले. समाजातल्या तळागाळातल्या लोकांना उत्तम वैद्यकीय सुविधा अल्प दरात मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉक्टर शिरीष कुमठेकर यांनी वाडिया हॉस्पिटल चा इतिहास उलगडून दाखवला. डॉक्टर घुली यांनी भविष्यकालीन योजनांचा आढावा घेतला. प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत शिरीष गोडबोले यांनी केले.
याप्रसंगी श्री प्रताप रेड्डी आणि श्री राम रेड्डी यांनी बालाजी अमाईन्स आणि त्यांचे काम तसेच वाडिया हॉस्पिटल ला सीएसआर फंडातून केलेली मदत याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. डॉक्टर राजीव वैशंपायन आणि डॉक्टर अश्विन वळसंगकर यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला.
आभार प्रदर्शन डॉक्टर विजय सावसकर यांनी केले.
एन एम वाडिया चॅरिटेबल ट्रस्ट ने आयोजित केलेल्या या उद्घाटन समारंभाला सोलापुरातले अनेक मान्यवर उपस्थित होते.
