भंडारा -(विशेष प्रतिनिधी) पवणी तालुक्यात जि.भंडारा येथे दि.१० जून रोजी चक्रीवादळात मृत्यू झालेल्या व जखमी झालेल्या महिलांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी श्री संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज सेवा संस्थेने निवासी उपजिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देऊन केली.
दि.१०/ ६ /२०२५ रोजी पवनी जिल्हा. भंडारा परिसरात तीव्र चक्री वादळाच्या तडाख्यात मौजा वलणी, ता. पवनी येथील स्मशानभूमीच्या कामावर मजूर म्हणून कार्यरत असलेल्या सौ. महानंदा प्रदीप वाकडीकर वय ३७ वर्ष व श्रीमती सीताबाई रामा अवसरे वय ४८ वर्ष या चक्रीवादळात सापडल्या.त्यापैकी सौ महानंदा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर श्रीमती सीताबाई ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्या आजही स्थिर नाहीत.
सदरहू महिला शासकीय स्मशानभूमीच्या कामावर मजूर होत्या. त्या दोन्ही महिला अति दुर्बल घटकातील चांभार समाज दलित समाजाच्या आहेत. घटनेच्या दिवसापासून आजपर्यंत कुठलीही शासकीय मदत या महिलांना मिळालेली नाही.
सदरहू मृत व पीडित महिलेला ताबडतोब शासकीय मदत मिळावी याकरिता श्री संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज विभागीय सेवा संस्थेच्या वतीने राजभाऊ खवसकर साहित्यिक यांचे अध्यक्षतेत व अॅड. राहुल बावणे कार्याध्यक्ष , नवीननिश्चल येनोरकर कार्यकारी संपादक विदर्भ आवृत्ती, दैनिक सूर्योदय,नितीन वानखेडे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना भंडारा, चंचल सार्वे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी भंडारा यांच्या वतिने लीना फलके निवासी उपजिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले.
याप्रसंगी सदाशिव बनसोड माजी सैनिक, नितीन भागवते ,सुमनताई अऱ्हाटे ज्येष्ठ समाजसेविका इंडियन रेडक्रॉस सोसायटी, नम्रता बागडे अध्यक्ष महिला अधिकार सामाजिक संघटना,सौ. पद्मा खवसकर, सौ सुरेखा शिंगाडे, संगीता डहाके इंडियन रेड क्रॉस सोसायटी भंडारा,जितेंद्र खोब्रागडे आम आदमी पार्टी याप्रसंगी उपस्थित होते.
