सोलापूर:- सोलापूरचे सुपुत्र, जागतिक पर्यावरणवादी, वन्यजीव अभ्यासक- संरक्षक, थोर साहित्यिक, पद्मश्री अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी निसर्ग प्रेमी नागरिक, सर्व धर्मिय- सर्व पक्षीय मान्यवर, कला- साहित्य शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, म. सा. प. सोलापूर, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर विकास मंच, ज्येष्ठ नागरिक संघटनांची शिखर समिती, हेरिटेज मणिधारी एम्पायर सांस्कृतिक मंडळ तथा समस्त सोलापूरकरांच्या वतीने रविवार दिनांक २२ जुन २०२५ रोजी, सायं. ५.२० वा. डफरिन चौक, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला शेजारील सारस्वत ब्राम्हण बहुउद्देशीय सभागृहात ‘श्रध्दांजली सभा’ आयोजित करण्यात आली आहे.
संयोजन समिती
डॉ. सुहास पुजारी, यशवंत सादुल, अँड. जे.जे. कुलकर्णी, केतन शहा, मिलिंद भोसले कुंडलीक मोरे, गुरुलिंग कन्नुरकर, प्रा. विलास मोरे, मन्मथ कोनापुरे,डॉ. रविंद्र चिंचोळकर, गजानन होनराव, दशरथ वडतीले, संजय जोगीपेटकर