कासेगाव:- (शफी मणियार ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील जिल्हा परिषद सदस्य रेखा राजेंद्र गायकवाड यांचे पती राजेंद्र गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
मुस्ती येथील ग्रामपंचायत मध्ये 1995 रोजी सदस्य झाले होते. त्यानंतर 2005 ते 2009 या कार्यकाला मध्ये ते मुस्ती गावचे सरपंच ही होते. सदैव जनतेच्या विकासासाठी ते प्रयत्नशील असत याची दखल घेत त्यांना 2017 च्या जिल्हा परिषद निवडणूकी मध्ये काँग्रेस पक्षातर्फे तिकीट ही दिले होते. आणि ते मोठ्या मताधिक्याने हि निवडून आले होते. सदैव बोरामणी जिल्हा परिषद गटातील गावच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद येथे ते तळ ठोकून असायचे शासनाच्या प्रत्येक योजनांचा लाभ हा आपण आपल्या गावच्या विकासासाठी राबवायच असं ते नेहमी आपल्या कार्यकर्त्यांना सांगत असायचे. परंतु आज त्यांचा 55 वा वाढदिवस ही मुस्ती ग्रामपंचायत येथे साजरा करण्यात आला होता.
अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या राजकिय कारकीर्द ला सुरुवात केली होती. ग्रामपंचायत सदस्य पासून जि प सदस्य पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा होता.
जि प मध्ये शिपाई पासून कलेक्टर ना आदराने बोलून काम करण्याची अनोखी कला त्यांच्याकडे होती. सरपंच पदाच्या कालावधीत गावात अनेक विकास कामे त्यांच्या प्रयत्नाने झाली. दुपारी त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे सोलापूर येथील श्रीराम हार्ट केअर सेंटर येथे त्यांना हलविण्यात आले होते. परंतु सायंकाळी त्यांचे प्राणज्योत मालवली. आज दुपारी मुस्ती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.
