राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल, शिवसेना शिंदे गट, कामगार सेना व राष्ट्रीय मजदूर संघ इंटक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक 19/5/2025 रोजी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ.गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली विडी कामगारांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निवेदन असे की, गेल्या 14 वर्षांपासून विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी दिली जात नाही. यासाठी अनेक संघटनांकडून वेळोवेळी शासन दरबारी तसेच सहाय्यक कामगार आयुक्त व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांच्याकडे प्रयत्न करून देखील कामगारांना न्याय मिळताना दिसत नाही. म्हणून मा.जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करण्यात आली की त्वरित विडी कामगारांना किमान वेतन मिळवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावे, अन्यथा वरील संघटना एकत्रित येऊन उग्र आंदोलन छेडण्याचा निर्धार करीत आहेत.
यावेळी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ.गोवर्धन सुंचू, अंबिका गादास, शारदा गुंडेटी, कामगार सेनेचे प्रदेश सचिव विष्णू कारमपूरी महाराज, विठ्ठल कुऱ्हाडकर, सविता दासरी, रेखा आडकी, राधिका मिठ्ठा, लक्ष्मीबाई, शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष सायबण्णा तेग्गेळी, इंटक चे अध्यक्ष राहुल गुजर, चंद्रकला गुजर, मीनाक्षी मादास आदी सहकारी उपस्थित होते.
