सरकोली ता.पंढरपूर – वेगाने विकसित होत असलेले पर्यटन स्थळ

गावकर्यांच्यावतीने विधानपरिषद उपसभापती डॉ निलम ताई गोर्हे यांना पर्यटन विकास स्थळाला भेट देण्यासाठी निमंत्रण देणार

सरकोली ता.पंढरपूर – वेगाने विकसित होत असलेले पर्यटन स्थळ

सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता.पंढरपूर पर्यटन स्थळ वेगाने विकसित होत आहे.या ठिकाणी भारतीय नौदलाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम पर्यटन स्थळावर आजी माजी सैनिक ,पोलीस बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.

या बांधकामासाठी दि 29-12-24 रोजी श्री भैरवनाथ विद्यालय सरकोलीचे विद्यार्थी,बाल सेवेकरी यांनी श्रमदान केले तर आजी माजी सैनिक ,पोलीस बांधवांनी दिवसभर श्रमदान केले.सरकोली ग्रामस्थ सेवेकरी रोज पर्यटन स्थळ निर्मितीचे कामात व्यस्त आहेत.‌

सध्या पर्यटन स्थळावर लोकवर्गणीतील कामे,माजी आमदार यशवंत तात्या माने यांनी आरसीसी वाॅल कंपाऊंड व रस्त्यासाठी, पिरसाहेब दर्गा जिर्णोद्धारसाठी दिलेल्या निधीची कामे चालू आहेत.तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सुशोभीकरण अशी कामे सुरू आहेत.

या भैरवनाथ नगरीचे बदलते रूप, वृक्ष वेली फुलझाडे, विविध स्थळे व पर्यटक यांची वाढत चाललेली गर्दी,लोकांच्या चेहऱ्यावरील भाव,आनंद पाहून सर्व गावकर्यांना मनस्वी आनंद होत आहे.

लोक स्वत:हून मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.आम्ही कोणत्याही तांत्रिक तज्ञांची मदत न घेता नियोजन केले आहे.ते साध्य होत चालले आहे.लोकप्रतिनिधी,ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य,मान्यवर मंडळी, गावकरी बंधू भगिनी यांच्या अनमोल सहकार्याने आपण पुढे जात आहोत. सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीस जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा असा सर्वांचा प्रयत्न सुरू आहे.आम्ही तर तन,मन, धनाने पुर्ण वेळ याकरीता देत आहोत. आमची माय माऊली इथे आल्यावर आनंद व्यक्त करते ते पाहून आम्ही भारावून जातो.आम्ही एवढ्यावर समाधानी नाही.हे गाव सुख समृद्धीने, आनंदाने भरभरून जावे. राज्यातील,देशातील माॅडेल पर्यटन स्थळ निर्माण व्हावे म्हणून खूप खूप कामे शासन , गावकरी बांधव व पर्यटन प्रेमी यांच्या माध्यमातून करावयाची आहेत. आपण इथे यावे आम्हास प्रोत्साहित करावे.या भुमिला आपला चरण स्पर्श व्हावा त्या स्पर्शाने आम्हाला उर्जा निर्माण व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो अशी भावना माजी पोलीस अंमलदार विलास श्रीरंग भोसले यांनी व्यक्त केली आहे.आम्ही सर्व गावकर्यांच्यावतीने विधानपरिषद उपसभापती डॉ निलम ताई गोर्हे यांना पर्यटन विकास स्थळाला भेट देण्यासाठी निमंत्रण देणार असल्याचेही विलास श्रीरंग भोसले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top