कासेगांव ता.पंढरपूर येथील श्री यल्लमा देवीची यात्रा संपन्न

कासेगांव ता.पंढरपूर /शुभम लिगाडे – कासेगांव ता.पंढरपूर येथील श्री यल्लमा देवीची यात्रा मार्गशीर्ष महिन्यामधील एकादशीला भरते.यावेळी जोगती,देवीचे जग,भावीकभक्त गावाच्या वेशीतून वाजत गाजत देवीच्या मंदिराकडे जातात. रात्री बारा वाजता देवीची पुजा व आरती होते.

दुसर्या दिवशी नेवैद्य,नारळ,लिंब,गंध अश्या प्रकारे विधी चालतात.गावांतील मानकरी देशमुख व देशपांडे यांचा नेवैद्य वाजत गाजत जातो.संध्याकाळी देवीची गाणी,आरती, जागरण इत्यादी कार्यक्रम होतात.

तिसर्या दिवशी पूजा,आरती होऊन मान- पानाचे कार्यक्रम होतात.पालखी गावातील दोन मानकरी देशमुख व देशपांडे यांच्या वाड्यामध्ये जाते.गावाला पालखीची प्रदक्षिणा होते.मंदिराला पाच प्रदक्षिणा मारून पुजारी,भाविकभक्त, मानकरी अग्नी होमाकडे रवाना होतात.देवीची पालखी, पुजारी,देवीची जग भावीकभक्त अग्नीतून जातात व यात्रा समाप्त होते.

या यात्रेसाठी महाराष्ट्र,कर्नाटक,तेलंगणा, आंध्र सह देशभरातून भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठ्या उत्साहाने येत असतात.
