युवा नेते प्रणव परिचारक वाढदिवसानिमित्त रिक्षा टांगा चालक बांधवांसाठी मोफत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना शिबीराचे आयोजन
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/१२/२०२४ – पांडूरंग परिवार युवक आघाडीच्यावतीने पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवा नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील रिक्षा आणि टांगा चालक बांधवांसाठी मोफत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोफत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना शिबीरात २ लाखां पर्यंत अपघाती संरक्षण विमा मिळणार असून यासाठी वयोमर्यादा १८ ते ७० वर्ष आहे.मोफत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडियात खाते असणे आवश्यक आहे.या विम्याची वैधता १ वर्ष अशी आहे.
दि.२१ व २२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत जनसंपर्क कार्यालय परिचारक वाडा विजापूर गल्ली, पंढरपूर येथे संपर्क करावा असे आवाहन प्रणव परिचारक युवा मंच, पंढरपूर शहर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
