मोटरसायकल हळू चालव म्हटल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण,दोघांविरोधात गुन्हा दाखल
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : नागणेवाडीतून वेगात मोटर सायकल चालवणार्यास मोटर सायकल हळू चालव असे म्हटल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी ओंकार सुर्यवंशी, नाना जगताप या दोघांविरुध्द अनुसुचीतजाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाने, यातील फिर्यादी लक्ष्मी दुशासन चंदनशिवे वय 34,रा.नागणेवाडी यांचा भाऊ राहुल, विराज हे दोघे दि.16 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.15 वाजता मोटरसायकल वरुन आठवडा बाजारासाठी चालले असताना फिर्यादीच्या घरासमोरील रोडवर ओळखीचे वरील आरोपी हे घराजवळ वेगात मोटर सायकल चालवत आले त्यावेळी फिर्यादीचा भाऊ राहुल याने त्याला मोटरसायकल हळू चालव असे म्हटल्यावर आरोपीने त्यास शिवीगाळ,दमदाटी करीत डाव्या गालावर चापट मारली व थांब महारा तुला बघून घेतो असे म्हणून आरोपींने त्याचा मित्र नाना जगताप यास बोलावून घेवून संगनमत करुन लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण करुन फिर्यादीचा भाऊ राहुल,काका राजू यांना मारुन जखमी केले तसेच सासू रुक्मिणी, मावशी गौरी यांना मुक्का मार दिला.
तुमची गाडी वापरण्याची लायकी आहे का ? परत नादाला लागाल तर तुम्हाला बघून घेईन अशी धमकी देवून जातीवाचक शिवीगाळ करत निघून गेले असल्याचे लक्ष्मी चंदनशिवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास मंगळवेढा विभागाचे डी.वाय. एस.पी.विक्रांत गायकवाड हे करीत आहेत.
