निवडणूक एकजुटीने लढवली तसेच महायुती सरकार एकजुटीने स्थापन करावे- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

निवडणूक एकजुटीने लढवली तसेच महायुती सरकार एकजुटीने स्थापन करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महायुतीला प्रचंड बहुमत देणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचे रिपाइंने राष्ट्रीय कार्यकारिणीत मानले आभार

नवी दिल्ली/मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज – महायुती ने एकजुटीने निवडणूक लढवली त्याच एकजुटीने महायुती चे सरकार स्थापन करावे तसेच महायुती सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद आणि एक विधान परिषद सदस्यत्व द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.नवी दिल्ली येथे रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत दिल्या बद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानणारा ठराव संमत करण्यात आला.या बैठकीत अनेक ठराव करण्यात आल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी पत्रकारांना दिली.नवीन महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ही माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली.

सन 2019 च्या निवडणुकीत मतदान केलेल्या झोपडी धारकांच्या झोपड्या पात्र करणारा कायदा राज्य सरकार ने करावा तसेच भूमिहीन शेतमजुरांना शेतीसाठी 5 एकर जमीन देण्यात यावी असे अनेक ठराव रिपाइं च्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाला महायुती सरकारच्या सत्तेत वाटा मिळावा यासाठी आपण भाजपा च्या केंद्रीय नेत्यांची आणि महायुती च्या नेत्यांची भेट घेणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.

रिपब्लिकन पक्षाचे येत्या एका वर्षात 2 करोड सदस्य बनविण्याचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले असून त्यासाठी आज रिपब्लिकन पक्षाच्या डिजिटल सदस्यता अभियान चा शुभारंभ ना.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या जिल्ह्यात तालुक्यात जनतेच्या प्रश्नांवर काम करावे प्रसंगी आंदोलन उभारून जनतेचे प्रश्न सोडवावेत या विषयांवर ना.रामदास आठवले यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top