LIVE: संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा नवा चेहरा यावर भाष्य केले

Maharashtra
महाराष्ट्रात महायुती आघाडीच्या मोठ्या विजयानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र सुरू आहे. तसेच यावेळी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. तसेच अशा परिस्थितीत आज संध्याकाळपर्यंत सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….

महाराष्ट्रात महायुती आघाडीच्या मोठ्या विजयानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र सुरू आहे. तसेच यावेळी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे आमदार आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले. सविस्तर वाचा

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, या इच्छेने राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये सामूहिक प्रार्थना आणि महाआरतीचा सुरु झाली आहे. सविस्तर वाचा

आज मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. तसेच अशा परिस्थितीत आज संध्याकाळपर्यंत सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. सवीस्तर वाचा

नव्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात होणार आहे. उपराजधानीत नव्या सरकारचे स्वागत सुरू झाले आहे. विधानभवन, रविभवन, नागभवन, आमदार निवास आदी ठिकाणी साफसफाई, रंगकाम, फर्निचरची दुरुस्ती, नूतनीकरण आदी कामे जोरात सुरू आहे. सविस्तर वाचा

महाराष्ट्रात सरकारचा नवा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वी जुन्या मुख्यमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यासाठी आज राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 10.30 ते 11 च्या दरम्यान राजभवनात पोहोचणार आहे. सविस्तर वाचा

आता उद्धव ठाकरे यांच्या या पराभवावर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतचे वक्तव्यही समोर आले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंची तुलना राक्षसाशी केली आहे. सविस्तर वाचा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे

Maharashtra Chief Minister Eknath Shinde resigned from his post and the Governor appointed him as caretaker Chief Minister until the next government is sworn in.

(Source: Raj Bhavan) pic.twitter.com/uKVvHbxOWz

— ANI (@ANI) November 26, 2024

https://platform.twitter.com/widgets.jsमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहे.

आज महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्रिपदाच्या निवडीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू होणार आहे. सविस्तर वाचा

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top