महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 2 नेत्यांवर दगडफेक, डोक्याला दुखापत



Maharashtra Election 2024: उद्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहे. या पूर्वी सोमवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करून हल्ला करण्यात आला. या मध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली असून सोमवारीच सांयकाळी आणखी एका नेतावर हल्ला करण्यात आला.

छत्रपती संभाजी नगर येथील गंगापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष चे उमेदवार सुरेश सोनावणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असून सोनावणे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. 

सदर घटनाला वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लांजी गावात अज्ञाताने दगडफेक केली. ही घटना सायंकाळी

7:30 वाजेच्या सुमारास घडली. सोनावणे यांना डोक्याला किरकोळ  दुखापत झाली असून त्यांना तातडीने मदत देण्यात आली.याआधी माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. दगडफेकीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. हा हल्ला कोणी केला याबाबत माहिती मिळू शकली नाही.  हा हल्ला कोणी केला आणि का केला याचा तपास पोलीस करत आहे. 

Edited By – Priya Dixit 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top