Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi: विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी असून महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते..
सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने काँग्रेसच्या हाती सत्ता दिली मालेगावमध्ये गरजले एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी मालेगाव येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना सत्तेची एवढी लालूच होती की त्यांनी शिवसेना काँग्रेसला दिली.
सांगलीमध्ये भाजप-आरएसएस बद्दल मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधान
वाशिम मध्ये MVA चा तणाव वाढला, शिवसेना UBT चे उमेदवार राजा भैय्या पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहे. मतदानाच्या अवघ्या तीन दिवस आधी शिवसेनेचे बंडखोर यूबीटी उमेदवार राजा भैय्या पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.