महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही



Dry Day in Maharashtra:महाराष्ट्रातील 288जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला राज्यभरात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या काळात दारूचे वितरण होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी दारूविक्रीवर बंदी घातली.

 

महाराष्ट्रात या महिन्यात 5 दिवस ड्राय डे असेल. या कालावधीत पब, बार, रेस्टॉरंट आणि दुकानांमध्ये मद्यविक्री होणार नाही. ड्राय डे मागचे कारण म्हणजे विधानसभा निवडणुका. तसेच प्रबोधिनी किवा देव उठानी एकादशी असल्याने मद्यविक्री होणार नाही. 

 

हिन्दू धर्मात प्रबोधिनी एकदशीला खूप  महत्त्व आहे.  ती 12 नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारी साजरी होणार आहे.उद्या महाराष्ट्रात ड्रायडे असणार. 

 

मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरातील दारूची दुकाने, पब, बार आणि रेस्टॉरंटमध्ये दारू विकली जाणार नाही. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील रतलाम, सागर, उमरिया आणि इंदूर जिल्ह्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्रात ड्रायडे असणार.

 

18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून निवडणूक प्रचार थांबणार आहे. त्यामुळे मद्यविक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे. 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 19 नोव्हेंबरपर्यंत दिवसभर ड्रायडे असणार. त्यानंतर 20 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत दारूविक्री होणार नाही.

 Edited By – Priya Dixit 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top