नागपुरमध्ये भीषण अपघातात 3 जण गंभीर जखमी


accident
Nagpur news : नागपुरातील हिंगणा टी-पॉइंटजवळ शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात झाला असून एकच खळबळ उडाली. भरधाव वेगाने जाणारी कार ट्रेलरला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.

 

मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये 1 मुलासह 3 जण होते. हे सर्वजण सोनबानगर, वाडी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात कार चालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.  

 

अचानक समोरून आलेला ट्रेलर पाहून भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या चालकाचे वाहनावर ताबा सुटला नाही. कार थेट ट्रेलरच्या मध्यभागी जाऊन आदळली. 

अपघात एवढा भीषण होता की, कारचे चक्काचूर झाले. पोलिसांना सूचना मिळताच पोलीस  घटनस्थळी दाखल झाली. नागरिकांच्या मदतीने तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top