रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर महिलेचा मृत्यू


Lady Death
Telangana News : तेलंगणातील निर्मल शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर एका 19 वर्षीय महिला शालेय कर्मचारिचा मृत्यू झाला आणि तिचे चार सहकारी आजारी पडले. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली.  

 

मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील ही महिला तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील बोथ मंडल येथील शाळेच्या स्वयंपाकघरात काम करायची. 2 नोव्हेंबर रोजी तिने शाळेतील इतर चार कर्मचाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये जेवण केले होते. त्याच रात्री तिला उलट्या आणि जुलाबाची तक्रार झाली. 3 नोव्हेंबर रोजी तिला उपचारासाठी स्थानिक सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याचे निदान केले. तसेच पाच नोव्हेंबरला उलट्या आणि जुलाबामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. रेस्टॉरंटमध्ये दिले जाणारे जेवण शिळे असल्याचा आरोप मुख्याध्यापकांनी केला आणि त्यामुळे काही कर्मचारी आजारी पडले आणि त्यातील एकाचा मृत्यू झाला. 

Edited By- Dhanashri Naik 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top