केलेल्या व सुरु असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेचं मतरुपी पाठबळ मिळवं- आमदार समाधान आवताडे

विकसित व सक्षम मतदारसंघ बनविण्या करिता महायुतीच्या कमळ चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्यावे – आमदार समाधान आवताडे

केलेल्या व सुरु असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेचं मतरुपी पाठबळ मिळवं- आ.समाधान आवताडे

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज :- २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुती चे अधिकृत उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी तीन वर्षाच्या कालावधीत या मतदारसंघात केलेल्या कल्याणकारी योजना व विकास कामे जनतेसमोर मांडत संवाद साधला व एक क्रमांकाच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी विविध गावातील मतदारां समोर केले.

जंगलगी ,बावची, खवे ,यड्राव या गावांमध्ये केलेल्या व सुरु असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेचं मतरुपी पाठबळ मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गावभेट प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांनी मतदारसंघात विविध गावांना भेट दिली.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ भाजपा व महायुती मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार आ.समाधान आवताडे यांनी आपल्या अडीच ते तीन वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची माहिती दिली, तसेच विकसित व सक्षम मतदारसंघ बनविण्याकरिता २० तारखेला महायुतीच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्यावे असे आवाहन यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी केले.

यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी राबवलेल्या विविध विकासाच्या धोरणांच्या माध्यमातून झालेल्या गावांमधील कल्याणकारी विकास कामे जनतेसमोर मांडत उपस्थितांशी संवाद साधला.

याप्रसंगी श्रीमती रुख्मिणीताई दोलतोडे, प्रवीण खांडेकर, दीपक भोसले, जमदाडे सर, राजेंद्र सुरवसे, दिपक भोसले, सरपंच आमसिध्द चोखेडे, निगोंडा पाटील, मल्लाप्पा चोखेडे, रंगाप्पा चोखेडे,आप्पू कस्तुरे,राजू भोसले,सिदमल चौघुले, अंकुश चोपडे आदींसह मान्यवर व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top