प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 15 जणांचा मृत्यू


almoda bus accident
अल्मोडा येथे बस सकाळी दरीत कोसळल्याने अपघात झाला असून बसमध्ये सुमारे 45 पेक्षा जास्त प्रवासी होते. अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे. तसेच उत्तराखंड पोलीस आणि SDRF घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडमधील अल्मोडा येथे भीषण रस्ता अपघात झाला असून गढवाल-रामनगर मार्गावरील सॉल्ट तहसीलच्या मार्चुला येथील कुपी गावाजवळ बस दरीत कोसळली. बसमध्ये सुमारे 45 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते. तसेच घटनास्थळी पोलीस आणि एसडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे. ही बस सोमवारी सकाळी नैनीकंदा ब्लॉकच्या किनाथ येथून प्रवाशांना घेऊन रामनगरला जाण्यासाठी निघाली असताना तोल गेल्याने ती खड्ड्यात पडली.  

 

या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.  

 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, अल्मोडा जिल्ह्यातील मर्चुला येथे झालेल्या बस दुर्घटनेतील मृतांची अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाला तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासन आणि SDRF च्या पथके उपस्थित आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच बस सुमारे 100 फूट खोल दरीत पडल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये 40 ते 50 जण होते.  

Edited By- Dhanashri Naik 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top