स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांची राजभवनाला भेट; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती

मुंबई ,दि.२९ ऑक्टोबर २०२४ : स्पेनचे पंतप्रधान श्री पेड्रो सांचेझ पत्नी डोना बेगोना गोमेझ यांच्यासह तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल सि.पी. राधाकृष्णन यांनी मुंबई भेटीवर आलेले स्पेनचे पंतप्रधान श्री पेड्रो सांचेझ यांचे शासनाच्या वतीने राजभवन मुंबई येथे स्वागत केले. यावेळी श्री. सांचेझ यांच्या पत्नी श्रीमती डोना बेगोनिया गोमेझ तसेच उच्चस्तरीय शिष्टमंडळ उपस्थित होते. महाराष्ट्राचे राज्यपाल सि.पी. राधाकॄष्णन यांनी श्री. सांचेझ यांच्या सन्मानार्थ राजभवन येथे स्नेहभोजन आयोजित केले होते. याप्रसंगी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सादर आमंत्रित होत्या.
याप्रसंगी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, राजशिष्टाचार सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते.