13 जणांची मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर दृष्टी गेली, डॉक्टरांसह तीन जण निलंबित



अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली की, छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर 13 जणांना डोळ्यांच्या संसर्गामुळे राजधानी रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या घटनेनंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.   

 

या प्रकरणी दंतेवाडा जिल्हा रुग्णालयातील तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यात शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचाही समावेश आहे. रायपूर येथील डॉ. भीमराव आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलच्या जनसंपर्क अधिकारी शुभ्रा ठाकूर यांनी सांगितले की, दंतेवाड्यातील 13 रुग्ण गेल्या पाच-सहा दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top