अनैतिक संबंधातून 8 वर्षाच्या मुलाची हत्या


child death
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 8 वर्षांच्या निष्पाप मुलाची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.   

 

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका लहान मुलाची हत्या करून त्याला जंगलात फेकण्यात आले. तसेच मृत पावलेल्या लहान मुलाच्या आईशी आरोपीचे प्रेमसंबंध होते. तसेच या अनैतिक संबंधांमध्ये या आठ वर्षाचा मुलाला अडथळा मानले जात होते. आरोपीने फोन केल्यानंतर लहान मुलगा त्याच्या आईला आरोपी सोबत बोलू द्यायचा नाही. व यामुळे आरोपीचा या लहान मुलावर राग होता. याच कारणावरून आरोपीने या निष्पाप चिमुरड्याची हत्या करून मृतदेह गाझियाबादच्या सिटी फॉरेस्ट परिसरात एका निर्जन भागात फेकून दिला. 

 

तसेच पोलीस अधिकारींनी दिलेल्या माहितीनुसार हा लहान मुलगा सायकल चालवण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच  नाही यामुळे त्याच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तातडीने मुलाचा शोध घेतला व त्यांना गाझियाबादच्या सिटी फॉरेस्ट परिसरात एक निर्जन ठिकाणी यालहान मुलाचा मृतदेह अढळला. तसेच पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही पहिले असता आरोपीची ओळख पटली व त्याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. 

 

Edited By- Dhanashri Naik 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top