विमानतळाजवळ भीषण स्फोट, 3 नागरिकांचा मृत्यू, अनेक जखमी



पाकिस्तानमधील कराची विमानतळाजवळ रात्री मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये सुमारे तीन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात 17 हून अधिक जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.  

 

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील कराची विमानतळाजवळ रात्री उशिरा एक मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये सुमारे तीन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच या स्फोटात 17 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहे. तर मृत झालेल्या तीन परदेशी नागरिकांपैकी दोघे चीनचे असल्याचे सांगण्यात येत आहे. कराची विमानतळाजवळ झालेल्या स्फोटाची संपूर्ण जबाबदारी या दहशतवादी गटाने घेतली आहे.

 

मिळतेय माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार रात्री 11वाजता हा स्फोट झाला, जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एका टँकरमध्ये भीषण स्फोट झाला. सिंध प्रांतात वीज प्रकल्पावर काम करणाऱ्या चिनी अभियंत्यांच्या ताफ्याला लक्ष्य करून हा स्फोट घडवण्यात आला. तसेच हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज शहरातील अनेक भागात दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटात जखमी झालेल्या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Edited By- Dhanashri Naik 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top