नागपुरात प्रेमाला नाकारल्यावरआरोपीचा महिलेला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न



प्रेमात अपयशी झाल्यामुळे नागपुरात एका 31 वर्षीय इसमाने एका महिलेला विजेचा धक्का देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली. पीडितेने आरोपीचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. विकी हजारे (31) असे आरोपीचे नाव आहे. 

 

आरोपी चार महिन्यांपूर्वी घटस्फोटित महिलेला सोशल मीडियावर भेटलाआणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा महिलेने त्याच्यासोबतचे नाते संपुष्टात आणले आणि त्याचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला तेव्हा परिस्थिती आणखीनच बिघडली. 

 

शनिवारी सकाळी आरोपी महिलेच्या घरी गेला आणि अंगणातील एका खोलीतजाऊन लपला. महिला कामावर जाण्याच्या तयारीत असताना त्याने तिला पकडले आणि तिच्या   गळ्यात इलेक्ट्रिक वायर बांधून तिला  करंट देण्याचा प्रयत्न केला. महिलेने ओरडायला सुरु केले. 

 

महिलेचा आरडाओरडा ऐकून तिची आई आणि मुलगा सावध झाले आणि मदतीसाठी धावले. शेजाऱ्यांच्या मदतीने आरोपीला  पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत हत्येच्या प्रयत्नासह गुन्हा दाखल केला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Edited By – Priya Dixit 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top