महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींची मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी, जाळीवर पडल्याने बचावले


narhari zirval

महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यांच्यासह दोन आमदारांनी देखील उडी घेतली. सुदैवाने खाली सुरक्षा रक्षक जाळी असल्यामुळे ते जाळीवर पडले आणि त्यांचा जीव वाचला. नरहरी झिरवाळ हे महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.

 

झिरवाळ हे अजित पवार गटाचे आमदार असून धनगर समाजाला एसटीचा दर्जा मिळावा.या साठी धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आहे.धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये आणि पेसा (पंचायत विस्तार ते अनुसूचित क्षेत्र) कायद्यांतर्गत सेवा घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यांच्या मागणीला राज्यसरकारच्या विरोध असल्यामुळे त्यांनी हे केले.

धनगर समाजाचा अनुसूची जमातीत आरक्षण कोट्यात समावेश करण्याची मागणी ला राज्य सरकारचा विरोध असल्यामुळे त्यांनी आदिवासी समाजाच्या आमदारांसह आंदोलन केले. आमदारांनी त्यांच्यासह  मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. आदिवासी समाजातील आमदार आणि खासदारांनी मंत्रालयात ठिय्या मांडला आहे. त्यात किरण लहामटे, हेमंत सावरा, काशीराम कोतकर यांचा समावेश आहे.

आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात आले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, असे करिण लहामटे यांनी म्हटले. उग्र निदर्शनांनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना जाळ्यातून बाहेर काढले. 

Edited by – Priya Dixit  

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top