दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ



नवी दिल्ली ते न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाला दिल्या जाणाऱ्या जेवणात झुरळ आढळून आले. याबाबत प्रवाशाने एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यानंतर एअर इंडियाने फूड सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडे चौकशी सुरू केली आहे. 

 

प्रवाशाने ट्विटरवर पोस्ट केले की, दिल्ली ते न्यूयॉर्कच्या फ्लाइटमध्ये त्याला ऑम्लेट देण्यात आले. त्यात एक झुरळ आढळून आले. मी आणि माझ्या दोन वर्षांच्या मुलाने अर्धे ऑम्लेट खाल्ल्यानंतर हे दिसून आले. हे खाल्ल्याने आम्हाला विषबाधा झाली आहे. त्यांनी एअरलाईन अधिकाऱ्यांसोबत सर्व्ह केलेल्या जेवणाचे व्हिडिओ आणि फोटोही शेअर केले. पोस्टमध्ये, प्रवाशाने एअर इंडिया, विमान वाहतूक नियामक DGCA आणि नागरी उड्डयन मंत्री के राम मोहन नायडू यांना देखील टॅग केले. 

एअर इंडियाने सांगितले की, नवी दिल्ली ते न्यूयॉर्कला जाणाऱ्या  फ्लाइटमध्ये घडलेल्या घटनेबद्दल आम्ही चिंतेत आहोत. अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही अन्न सेवा प्रदात्याशी बोललो आहोत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आम्ही आवश्यक ती कारवाई करू.

Edited by – Priya Dixit  

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top