अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले


aditya thackeray
बदलापुरातील बलात्कार प्रकरणाचा अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार झाला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडली ती गोळी त्याच्या डोक्यात लागली आणि त्याचा मृत्यू झाला. या एन्काऊंटरवर विरोधक चांगलेच संतापले असून राज्य सरकार वर ताशेरे युद्धात आहे. एन्काऊंटरवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

बदलापूर चकमकी बाबत राज्यात सातत्याने वाद सुरु आहे. वरळीचे आमदार आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बदलापूर लैंगिक अत्याचारात मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, एका आपटेला वाचविण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या करण्यात आली. ही चकमक होती की हत्या की आत्महत्या असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

लैंगिक छळाबाबत ते म्हणाले, शिंदे सरकार अपयशी ठरले आहे. हे शिंदे यांच्या प्रशासनाचे पूर्णपणे अपयश आहे. पीडितेच्या आईला एफआयआर दाखल कण्यासाठी वारंवार पोलीस ठाण्यात जावे लागले असे त्यांनी अधोरेखित केले आहे. 

या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आहे तर ट्रस्टी आणि सचिव तुषार आपटे आहे.काही काळापूर्वी सोशल मीडियावर एक बॅनर व्हायरल झाला होता या बॅनर मध्ये तुषार आपटेचा फोटो असून त्यांना अंबरनाथ जिल्ह्यातील जनकल्याण समितीचे अध्यक्ष संगितले होते. 

लैंगिक छळ  प्रकरणात बदलापूर शाळेचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्या विरुद्ध प्रकरणाचे सह आरोपी म्हणून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Edited By – Priya Dixit 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top