अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडी करणार, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप


maharashtra police
Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस कोठडीदरम्यान झालेल्या चकमकीत मृत्यू  झाला. या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार आहे. 

सोमवारी अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून पोलिस व्हॅनमध्ये बदलापूरला नेत असताना त्याने पोलिस अधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला आणि अक्षय ठार झाला. या घटनेत एका पोलिसालाही गोळी लागली. दरम्यान, अक्षयच्या कुटुंबीयांनी पोलिस चकमकीवर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.अक्षयच्या  कुटुंबीयांनी ही चकमक नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. 

अक्षय शिंदेच्या एन्काउंटर मृत्यूशी संबंधित प्रकरणाचा तपास सीआयडी करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ठाणे पोलिसांनी महाराष्ट्र सीआयडीला पत्र लिहून अक्षयच्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास कोठडीतील मृत्यूच्या तपासाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्याची विनंती केली आहे. यामुळे मुंब्रा पोलिसात दाखल झालेल्या या गुन्ह्याच्या तपासाची कमान लवकरच सीआयडीकडे येणार आहे.

या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून तपास सुरु आहे.लवकरचहे प्रकरण सीआयडी कडे जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. अद्याप एन्काउंटरच्या तपासणीसाठी एसआयटीचे गठन झाले नाही. 

Edited By – Priya Dixit 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top