मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गादेगाव बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गादेगाव बंद

गादेगाव ता.पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.३/०९/२०२४- गेले आठवडाभरापासून आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसले आहेत.दिवसेंदिवस त्यांची प्रकृती चिंताजनक बनत चालली आहे.

आज त्यांच्या उपोषणाची दखल घेण्यास सरकार तयार नाही. याचा निषेध म्हणुन आज समस्त गावकऱ्यांच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गादेगाव बंद ठेवुन आंदोलन करण्यात आले.या गादेगाव बंद आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top