माँ साहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या 29 व्या स्मृतिदिनानिमित्त उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांच्याकडून अभिवादन
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०९/२०२४- माँ साहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या 29 व्या स्मृतिदिनी राज्यभरात शिवसैनिकांकडून विविध उपक्रम घेऊन अभिवादन करण्यात येत आहे.आज पुणे शहरातील सारसबागेसमोरील बाळासाहेब भवन येथे माँ साहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यावेळी डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली स्व.माँ साहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून येत्या काळात माँ साहेब मीनाताई ठाकरे मातृत्व गौरव योजना सुरू करण्यात यावी, असा आमचा संकल्प आहे जेणेकरून राज्यभरातील महिलांकरीता विशेष मदत होईल.यापूर्वीदेखील विविध माध्यमातून शिवसेनेच्यावतीने महिलांना आजवर विशेष मदत करीत आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की,पुणे शहरात माँ साहेबांचा पुतळा कोणत्याही भागात नाही. त्यामुळे ठाकरे कुटूंबाकडून आम्हाला जर परवानगी दिली तर पुणे शहरातील बाळासाहेब भवन येथे माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभा करू अशी विनंती ठाकरे कुटुंबीयांकडे त्यांनी केली.