ट्रक ने टाटा मॅजिकला धडक दिल्याने 8 भाविकांचा मृत्यू



हरियाणाच्या जींद जिल्ह्यात नरवाना परिसरात एका भाविकांनी भरलेल्या टाटा मॅजिकला ट्रक ने धडक दिली. या अपघातात तीन महिलांसह एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. 

हरियाणातील कुरुक्षेत्राच्या मार्चेडी गावात राहणारे 16 जण टाटा मॅजिक ने राजस्थानमधील गोगामेडी धाम येथे पूजेसाठी जात असताना रात्री 1 वाजेच्या सुमारास नरवणातील बिरधना गावाजवळ पोहोचले. दरम्यान, मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने टाटा मॅजिकला धडक दिली. टक्कर होताच भाविकांनी भरलेले वाहन खड्ड्यात कोसळले आणि पालटले. अपघातानंन्तर सर्वत्र गोंधळ उडाला. आरडा ओरड सुरु झाला आणि नागरिक आवाजाच्या दिशेने धावले. हे भाविक वाहनांत अडकले होते. त्यांना काढण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. अंधार जास्त असल्यामुळे त्यांना यश मिळाले नाही. 

अपघाताची माहिती नरवाना पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना वाहनांतून बाहेर काढले आणि जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यापैकी 8 जणांना मृत घोषित केले. पोलीस प्रकरणाचा शोध घेत आहे.  

Edited by – Priya Dixit  

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top