चंपाई सोरेन आज आपल्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश करणार



झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन आज आपल्या मुलासह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. तसेच चंपाई सोरेन भाजपमध्ये सहभागी झाल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांनी सोशल मीडिया माध्यमातून दिली आहे. तसेच सीएम हिमंता विश्व शर्मा यांनी माहिती देताना सांगितले होते की, सोरेन 30 ऑगस्टला रांचीमध्ये पक्षात सहभागी होतील. तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सोरेन यांच्या भेटीचा फोटोही पोस्ट केला होता.

 

मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला भाजपचे झारखंड विधानसभा निवडणुकीचे सहप्रभारी शर्माही उपस्थित होते. तसेच आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर लिहिले, “झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या देशाचे ज्येष्ठ आदिवासी नेते चंपाई सोरेन जी यांनी काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  यांची भेट घेतली आहे. व आज 30 ऑगस्टला ते रांचीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top